दौंड DYSP यांनी छेडछाड केल्याचा आरोप, महिलेचं मंत्रालयासमोर टोकाचं पाऊल

दौंड DYSP यांनी छेडछाड केल्याचा आरोप, महिलेचं मंत्रालयासमोर टोकाचं पाऊल

| Edited By: Mrunal Patil | Updated on: Nov 29, 2021 | 1:14 PM

मंत्रालयाच्या बाहेर एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्यातील दौंडच्या पोलीस उपअधीक्षकांनी आपल्यासोबत छेडछाड केल्याचा आरोप तिने केला आहे.

मुंबई : मंत्रालयाच्या बाहेर एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्यातील दौंडच्या पोलीस उपअधीक्षकांनी आपल्यासोबत छेडछाड केल्याचा आरोप तिने केला आहे. या प्रकरणी न्याय मिळत नसल्याने मुंबईत येऊन मंत्रालय परिसरात तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. तक्रार करणारी महिला पेशाने वकील आहे. आत्महत्येच्या प्रयत्नाचा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला असून सध्या पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us