शिंदेंची मदत गावकऱ्यांनी नाकारली! साहित्य किट घेऊन आलेले टेम्पो परत पाठवले
धाराशिव तालुक्यातील करंजा गावातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेकडून मदत म्हणून पाठवलेले साहित्य किट ग्रामस्थांनी परत पाठवले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरित्या हे किट पाठवली होती. ग्रामस्थांच्या मते, प्रशासनाकडून पुरेशी मदत मिळालेली नसल्याने त्यांनी ही मदत नाकारली.
धाराशिव तालुक्यातील परंडा येथील करंजा गावात भीषण पूर आल्याने ग्रामस्थ मोठ्या संकटात सापडले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या वतीने मदतीसाठी 12 साहित्यांची किट असलेले टेंपो पाठवले होते. मात्र, ग्रामस्थांनी हे टेंपो परत पाठवले. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, प्रशासनाकडून पुरेशी मदत मिळालेली नाही आणि तीन दिवसांपासून ते उपाशी आहेत. त्यांना फक्त पाणी पुरवले जात आहे. त्यांच्या मते, शिंदे यांची मदत केवळ देखावा आहे आणि त्यांना प्रत्यक्षात मदतीची गरज आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण संसार पाण्यात गेले आहे, शेती, जनावरे आणि लहान मुले धोक्यात आहेत. त्यांना अधिक मदतीची गरज आहे.
Published on: Sep 24, 2025 03:40 PM
Latest Videos
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

