Maharashtra Flood : महाराष्ट्रात अतिवृष्टी, अस्मानी संकटात बळीराजा खचला, एकच आक्रोश अन् अश्रू थांबेना
महाराष्ट्रामध्ये मराठवाडा, सोलापूर, सातारा आणि नाशिकसह अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांनी तातडीने आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
महाराष्ट्रातील मराठवाडा, सोलापूर, सातारा आणि नाशिक जिल्ह्यांसह अनेक भागांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. लाखो रुपयांचे उभे पीक पाण्यात बुडाले असून, अनेकांच्या शेतात पाणी साचल्याने पिके कुजली आहेत. द्राक्षे, सोयाबीन, मका, कापूस, ऊस आणि तूर यांसारख्या प्रमुख पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
जालना, बीड, परभणी, लातूर आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्येही परिस्थिती गंभीर आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी हताश होऊन “जगावं की मरावं” असा सवाल केला आहे, तर नांदेडमध्ये जलसमाधी आंदोलनही करण्यात आले. तात्काळ नुकसान भरपाई मिळावी, अशी शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी नुकसानीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

