AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समान नागरी कायद्याबाबत मोठी अपडेट! मुख्यमंत्र्यांनी केली थेट घोषणा; पुढील 6 महिन्यात...

समान नागरी कायद्याबाबत मोठी अपडेट! मुख्यमंत्र्यांनी केली थेट घोषणा; पुढील 6 महिन्यात…

| Updated on: Jul 09, 2026 | 2:42 PM
Share

राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यापूर्वी या कायद्याचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. आता विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नावे जाहीर केली आहेत.

राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यापूर्वी या कायद्याचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. आता विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नावे जाहीर केली आहेत.

माजी न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत माजी महाअधिवक्ता रमेश पतंगे, घटनातज्ज्ञ सुवर्णा रावल आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे.

ही समिती पुढील 6 महिन्यांत समान नागरी कायद्याचा अभ्यास करून आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर करणार आहे. त्यानंतर या अहवालाच्या आधारे कायद्याचा मसुदा तयार केला जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात हा मसुदा दोन्ही सभागृहांसमोर मांडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून कायदा करण्याची कार्यवाही केली जाईल.

Published on: Jul 09, 2026 02:42 PM

Follow Us
Aamir Khan : सलमान नंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर? मिळाली मोठी धमकी; कारण धक्कादायक.

Aamir Khan : सलमान नंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर? मिळाली मोठी धमकी; कारण धक्कादायक

Abhijeet Dipke : सोनम वांगचूक यांचं उपोषण मोडून काढल्यानंतर अभिजीत दीपके यांच्या दोन मोठ्या घोषणा.

Abhijeet Dipke : सोनम वांगचूक यांचं उपोषण मोडून काढल्यानंतर अभिजीत दीपके यांच्या दोन मोठ्या घोषणा

Modi Govt : डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी दोन तृतीयांश बहुमताची गरज असताना भाजपसाठी एक Good News.

Modi Govt : डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी दोन तृतीयांश बहुमताची गरज असताना भाजपसाठी एक Good News

Sanjay Raut : आजच्या रामरक्षा आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठी वांगचुक यांना हटवलं – संजय राऊत कडाडले.

Sanjay Raut : आजच्या रामरक्षा आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठी वांगचुक यांना हटवलं – संजय राऊत कडाडले

चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, ठाकरेंच्या आंदोलनापूर्वी नागपूरमध्ये मोठी घडामोड, कोणत्या विषयावर चर्चा?.

चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, ठाकरेंच्या आंदोलनापूर्वी नागपूरमध्ये मोठी घडामोड, कोणत्या विषयावर चर्चा?

सोनम वांगचूक यांना अटक केली तरी आंदोलन सुरू राहणार; शरद पवार थेट बोलले.

सोनम वांगचूक यांना अटक केली तरी आंदोलन सुरू राहणार; शरद पवार थेट बोलले