Marathwada Floods : मराठवाड्यात ढगफुटी, पुरामुळं गावं पाण्याखाली, भितीपोटी लोकं डोंगरावर.. कुठं वीज नाही कुठं गावचा संपर्क तुटला
मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांना पूर आला आहे. वनवेवाडी मोराळा गाव पूर्णपणे पाण्याखाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड गावाचा संपर्क तुटला आहे. अनेक महामार्गांवर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
मराठवाड्यात आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वनवेवाडी मोराळा हे गाव पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. पुराच्या भितीपोटी ग्रामस्थ डोंगरावर जाऊन आश्रय घेत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून वीजपुरवठाही खंडित आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड गावाचा नदीच्या पुरामुळे संपर्क तुटला आहे. अहिल्या नगरमध्ये सिना नदीला पूर आला असून, अनेक रस्ते बंद झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातही अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

