‘नौदलाने 30 फुटांचा पुतळा सांगितला याची कल्पना नव्हती, आम्ही तर…’, सरकारी अधिकाऱ्याच्या दाव्यानं खळबळ
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला, त्या संदर्भात नवनवीन माहिती समोर येत आहेत. पुतळा उभारणीसाठी कला संचलनालयाची परवानगी आवश्यक असते. आता कला संचलनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे खरं काय? असा सवाल केला जातोय.
आमच्याकडे फक्त ६ फुटांचीच परवानगी मागण्यात आली होती, असं म्हणत कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी हा खळबळजनक दावा केला आहे. इतकंच नाहीतर नौदलाने ३५ फुटांचा शिवरायांचा पुतळा सांगितला याची कल्पनाच नसल्याचेही राजीव मिश्रा यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, राजीव मित्रा यांनी केलेल्या या अजब दाव्याने एकच खळबळ माजली आहे. शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या दुर्घटनेवर बोलताना राजीव मिश्रा म्हणाले, या संपूर्ण प्रकरणांमध्ये कला संचालनालय यांची कोणती चूक नाहीये. आम्ही केवळ सहा फुटाच्या पुतळ्याची परवानगी दिली होती पण ते काम नेव्हीला देण्यात आलं आणि नंतर हा पुतळा 35 फुटाचा उभारण्यात आला. यानंतर कोणीही आम्हाला याबद्दल कल्पना दिली नाही. असे प्रकार घडल्यावर त्यांच्यावर कारवाईचे अधिकार आम्हाला नाहीत. आम्ही केवळ तो पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसतो का तेवढेच सांगण्याचं काम करतो आणि विनाकारण यात आमची बदनामी केली जात आहे, असेही ते म्हणाले. यामध्ये शिल्पकाराने घाई गडबडीमध्ये काहीतरी चूक केलीये असं प्रथम दर्शनी निदर्शनास येतंय आणि हा पुतळा जर इतका मोठा असेल तर तो ब्रांझचा तयार करण्यात यायला हवा होता मात्र स्टील प्लेट्स टाकून त्या ठिकाणी बिल्डिंग करण्यात आलं आणि वेल्डिंगही निकृष्ट दर्जाचं होतं नटबोल्ट वापरण्यात आले त्यामुळे हा पुतळा पडलाय असं वाटतंय, असेही त्यांनी सांगितले.
अपघातात अजित पवार यांचा मृत्यू, रूपाली ठोंबरेंना अश्रु अनावर
अजित पवारांच्या मृत्यूनंतर राज ठाकरेंची भावनिक पोस्ट!
अजित पवारांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी शारदा प्रांगणात ठेवण्यात येणार
अजित पवार अकाली निधन; शरद पवार, प्रतिभा पवार बारामतीत

