पहिल्या ‘महिला महाराष्ट्र केसरी’चा थरार, कोण मारणार बाजी, कोण नेणार मानाची गदा?
सांगली जिल्ह्यााला पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याचा मान मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महिला कुस्तीपटूंमध्ये चैतन्याचे वातावरण आहे
सांगली : काही दिवसांपुर्वीच पुण्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार पहायला मिळाला. त्यानंतर पहिल्यांदाच महिलांचीही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार ही कुस्ती शौकिनांना पहायला मिळणार आहे. मात्र याच्याआधीच या स्पर्धेवरून पुणे की सांगली हा वाद रंगला. आणि वादाची बाजी मारली ती सांगलीने. सांगलीने पुण्याला चितपट करत ही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा खेचून आणली. आता सांगलीत 23 आणि 24 मार्चला ही कुस्ती स्पर्धा होणार आहे. याची जोरदार तयारी सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
सांगली जिल्ह्यााला पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याचा मान मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महिला कुस्तीपटूंमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. पहिली महिला महाराष्ट्र केसरीची गदा सांगली जिल्ह्यातच खेचून आणण्यासाठी कुस्तीपटू तयारीला लागल्या आहेत. तर राज्याच्या सर्व जिल्ह्यातून सुमारे 350 ते 400 महिला मल्ल या स्पर्धेत भाग घेण्यासाठी येतील.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

