Devendra Fadnavis | लोकशाहीला डब्बा बंद करण्याचं काम सुरु ते बंद व्हावं – देवेंद्र फडणवीस
पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून विधिमंडळाचे कामकाज सुरु झाले आहे. यावेळी विरोधकांनी विविध मुद्यांवरुन राज्य सरकारला धारेवर धरले आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकारवर टीका केली आहे.
विधिमंडळाच्या (Maharashtra Monsoon Session 2021) कामकाजाला सुरुवात झाली आणि विरोधकांनी सुरुवातीलाच एमपीएससी (MPSC) आणि स्वप्निल लोणकरच्या (Swapnil Lonkar) आत्महत्येवरुन सरकारला धारेवर धरलं. “सगळं कामकाज बाजूला ठेवा पण MPSC वर चर्चा व्हायलाच हवी. कारण आज राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या, युवकांच्या मनातील हा प्रश्न आहे. एमपीएससी आपल्या पावलाने चालतीय, तिला एका स्वप्निलने आत्महत्या केली काय, जगला काय आणि मेला काय… काहीही फरक पडत नाही…. एमपीएससीला स्वायत्तता दिली आहे म्हणजे स्वैराचार नाही.. अशी आक्रमक भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली.
देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकशाहीला डब्बा बंद करण्याचं काम सुरु ते बंद व्हावं ‘ अशा शब्दात राज्य सरकारवर टीका करत त्यांना धारेवर धरले. तसेच सरकार एमपीएससीवर काय पावलं उचलणार आहे, हे जाहीर करावं, असं आव्हानही त्यांनी केलं.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

