Meat Ban on Independence Day : ‘तो’ निर्णय काँग्रेस काळातील, 15 ऑगस्टला मांसाहार विक्रीवर बंदी; टीका होत असताना सरकारनं स्पष्टच म्हटलं…
१५ ऑगस्टला मांसाहार विक्री बंदचा निर्णय काँग्रेस काळातील असं यावर सरकारचं म्हणणं आहे. १२ मे १९८८ रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारने निर्णय घेतला १९८८ च्या निर्णयानुसार बंदीचा पालिकेला अधिकार असल्याचं राज्य सरकारचं या संदर्भातील स्पष्टीकरण आहे.
महाराष्ट्रामध्ये काही महापालिकांमध्ये १५ ऑगस्ट रोजी कत्तलखाने आणि मांसाहार विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. पण तो निर्णय आजचा नाहीये. हा निर्णय प्रत्यक्षात १२ मे १९८८ रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतला होता आणि त्यानंतर तो लागू झाला आहे. या निर्णयानुसार प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, गांधी जयंती, रामनवमी, महावीर जयंती या दिवशी कत्तलखाने बंद ठेवण्याचा अधिकार महापालिकेला देण्यात आला. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळातही कत्तलखाने आणि मांसाहार विक्री दुकाने बंदचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, 15 ऑगस्टला मटण, चिकन विक्री आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आलाय. कल्याण डोंबिवली पासून मुख्यमंत्र्यांच्या नागपूर, अमरावती, मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगर पर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच आतापर्यंत पाच महापालिकांमध्ये स्वातंत्र्यदिनी चिकन मटण मिळणार नाही. कल्याण डोंबिवली, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूरमध्ये चिकन मटण विक्रीला बंदी घातली असून कत्तलखाने ही बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहेत.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

