Dananjay Munde यांची सध्या प्रकृती उत्तम, त्यांना विश्रांतीची गरज, संजय बनसोडे यांची माहिती
काल पक्ष कार्यालयात पवार साहेबांकडे असताना धनंजय मुंडेंना अचानक भोवळ आली. त्यानंतर काही काळ त्यांची शुद्ध हरपली होती. त्यांना इथे आणलं तेव्हाही ते अनकॉन्शस होते. एमआरआयनंतर त्यांना शुद्ध आली, असं अजित पवारांनी सांगितलं. तर राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी देखील धनंजय मुंडेंची प्रकृती स्थिर असल्याचं म्हटलंय.
मुंबई : ठाकरे सरकारमधील सामाजिक न्याय विभागाचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मंगळवारी रात्री त्यांना हार्ट अटॅक (Heart Attack) आल्याचं वृत्त समोर आलं होतं, मात्र बुधवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा सौम्य धक्का आल्याच्या वृत्ताचं खंडन केलं. भोवळ आल्याने काल त्यांची शुद्ध हरपलेली होती, मात्र धनंजय मुंडे यांची प्रकृती आता बरी आहे, त्यांना आयसीयूमध्येमध्ये ठेवण्यात आलं आहे. मी डॉक्टरांशी बोललो. त्यांचं फुल चेक अप करण्यात येणार आहे. त्यांना माईल्ड हार्ट अटॅक आल्याचं वृत्त काल पसरलं होतं, मात्र त्यात तथ्य नाही. दोन-तीन दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येईल, आज दुपारी त्यांना स्पेशल रुममध्ये शिफ्ट केलं जाईल. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घ्यायला सांगितलं आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. तर यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी देखील मुंडेंची भेट घेतली.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

