Karjat Nagar Panchayat Election 2022 | कर्जतमध्ये रोहित पवारांची जादू, राष्ट्रवादीची एक हाती सत्ता

राज्यातील नगर पंचायतीच्या निवडणुकांचे निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील नगर पंचायतीचा पहिला निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने लागला. त्यानंतर विजयाची घोडदौड कायम ठेवत राष्ट्रवादीने कर्जत नगरपंचायतीवर वर्चस्व निर्माण केलं आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Jan 19, 2022 | 12:10 PM

राज्यातील नगर पंचायतीच्या निवडणुकांचे निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील नगर पंचायतीचा पहिला निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने लागला. त्यानंतर विजयाची घोडदौड कायम ठेवत राष्ट्रवादीने कर्जत नगरपंचायतीवर वर्चस्व निर्माण केलं आहे. या निवडणुकीत 17 पैकी 12 जागा जिंकून राष्ट्रवादीने कर्जत नगरपंचायतीवर एक हाती सत्ता आणली आहे. तर भाजपने दोन जागा जिंकल्या आहेत. कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे राम शिंदे यांच्यात कांटे की टक्कर होती. मात्र, रोहित पवार यांनी राम शिंदेंना कात्रजचा घाट दाखवत कर्जत नगरपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें