सुपेकरांची कॅमेऱ्यासमोर मुजोरी, माध्यमांचा माईक हातानं झिडकारला; ‘त्या’ गंभीर आरोपांवर बोलण्यास नकार
वरिष्ठ पोलीस अधिकारी सुपेकारांना अंजली दमानिया यांनी पोलीस निरीक्षकांकडून वसुलीचा नवा आरोप केला. तर आतापर्यंत सहा ते सात आरोप होऊन देखील सुपेकर मात्र कॅमेरा समोर बोलण्यास तयार नाहीत. उलट मिडीयाने प्रश्न विचारताच त्यांची मुजोरी पाहायला मिळाली.
वैष्णवी हगवणे प्रकरणामधून आरोपाच्या घेरात आलेले विशेष पोलीस महानिरीक्षक जालींदर सुपेकर यांच्यावर सहा मोठे आरोप झाले. माध्यमांनी त्यावर त्यांचं म्हणणं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण सुपेकारांची मुजोरी पुन्हा एकदा दिसली. माध्यमांचा माईक त्यांनी हाताने झिडकारला.
सुपेकरांवर झालेले आरोप हे गंभीर आहेत. वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर आरोपी पत्नी आणि भाचा शशांक हगवणेला मदत केल्याचा पहिला आरोप सुपेकर यांच्यावर झाला. शशांक हगवणेला पिस्तुलाचा परवाना सुपेकर यांच्या सांगण्यावरून देण्यात आल्याचा आरोप आहे. कैद्यांना दिवाळी मध्ये फराळामध्ये आर्थिक अपहरणाचा आरोप राजू शेट्टीनी केला. तर बीडच्या जेलमध्ये असलेल्या वाल्मीक कराडकडे ३०० कोटींची मागणी केल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलाय. तर मुळ पुण्यातला आणि अमरावतीच्या जेलमध्ये शिफ्ट झालेला कैदी गायकवाड यांच्याकडे ५०० कोटी मागितले असा आरोपही करण्यात आलाय. गायकवाड यांच्याच लॉकर मधील सोने जप्त करताना १५० कोटींचा भ्रष्टाचार केला असा आरोप वकील निवृत्ती कराड यांनी सुपेकर यांच्यावर केलाय.
मात्र एकाही आरोपावर जालिंदर सुपेकर ऑन कॅमेरा बोलण्यास तयार नाहीत. मात्र दुसरीकडे भाजपचेच माजी आमदार भीमराव धोंडेनी मात्र सुपेकारांची पाठराखण केली. कैद्यांकडून ३०० ते ५०० कोटी अधिकारी कसा मागू शकतो? पोलीसांची बदनामी करू नका असं धोंडे म्हणतायत.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा

