Vaishnavi Hagawane Case : … सुपेकरांचे मेहुणे शशिकांत चव्हाण यांचा हात, सुषमा अंधारेंचे आरोप काय?
550 कोटी रूपये दे आणि जेलमधून बाहेर ये नाहीतर जेलमध्येच राहशील, असं सुपेकरांनी कैद्याला सांगितलं असल्याचा दावा दमानिया यांनी केल्यानंतर सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप काय?
जालिंदर सुपेकर यांचे मेव्हणे शंशिकात चव्हाण यांच्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आरोप केलेत. हगवणे प्रकरण प्रभावित करण्यात शशिकांत चव्हाण यांचा हात होता, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय. तर हगवणे कुटुंबीयांशी कोणताही संबंध नसल्याचे म्हणत शशिकांत चव्हाण यांनी माझ्यावरील आरोप चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण दिलंय. जे आरोप केले जात आहेत ते चुकीचे असून अर्धवट माहितीच्या आधारे असल्याचे शशिकांत चव्हाण यांनी म्हटलंय. शशिकांत चव्हाण हे पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत. दरम्यान, यासंदर्भात बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, वैष्णवी हगवणे प्रकरणात तपास करत असताना साधारण पीआय असणाऱ्या शशिकांत चव्हाणकडे एवढी मोठी प्रोपर्टी कशी? त्यांच्या मालमत्तेचे स्त्रोत नेमके काय? ते तपासले गेले पाहिजे, याची माहिती ईडीने घ्यावी, अशी मागणीही सुषमा अंधारे यांनी केली आहे.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा

