Raj Thackeray : राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’बाहेर गस्त वाढवली, कारण नेमकं काय? विरोधकांनी घेरलं
राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली असून कारण अस्पष्ट आहे. तसेच, पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानाच्या बाहेर अचानक गस्त वाढवण्यात आली आहे. यामागे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. स्थानिक पोलिसांनी सुरक्षा वाढवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सत्ताधाऱ्यांना राज ठाकरेंची भीती वाटत असल्यामुळे सुरक्षा वाढवली का, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. रविवारी उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर ड्रोन घिरट्या घालत असल्याची घटना उघडकीस आल्यानंतर, आता राज ठाकरेंच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आल्याचे बोलले जात आहे. एखाद्या नेत्याची सुरक्षा वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय डीजींच्या अंतर्गत असलेली समिती घेत असते, असेही स्पष्टीकरण देण्यात आले.
Published on: Nov 10, 2025 09:55 PM
Latest Videos
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...

