Bharatshet Gogawale | बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं आहे रडायचं नाही, लढायचं : भरत गोगावले-TV9

अस्लम अब्दुल शानेदिवाण, Tv9 मराठी

Updated on: Aug 25, 2022 | 12:05 PM

बाळासाहेबांनीच आम्हाला सांगितलं आहे रडायचं नाही, लढायचं. त्यामुळे आम्ही लढत आहोत. तर जर कोणी आमच्या आमच्या अंगावर आलं तर आम्ही अंगावर घेऊ. तुम्ही तुमची शिस्त पाळा आम्ही आमची पाळू असा थेट इशारा भरत गोगावले यांनी दिला.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान चार दिवसात विरेधकांनी शिंदे गटातील आमदारांना डिवचल्यानंतर आज शिंदे गटातील आमदारांनी उलट प्रतिक्रीया दिली. यावेळी सत्ताधाऱ्यांनी विरोधकांविरोधात आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यानंतर शिंदे गटातील नेते भरत गोगावले यांनी माध्यमांशी बोलताना थेट विरोधकांना इशारा दिला. तसेच भरत गोगावले म्हणाले कि, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनीच आम्हाला सांगितलं आहे रडायचं नाही, लढायचं. त्यामुळे आम्ही लढत आहोत. तर जर कोणी आमच्या आमच्या अंगावर आलं तर आम्ही अंगावर घेऊ. तुम्ही तुमची शिस्त पाळा आम्ही आमची पाळू असा थेट इशारा भरत गोगावले यांनी दिला.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI