Maharashtra Weather : राज्यात पुन्हा धुव्वाधार, ‘या’ जिल्ह्यात रेड अलर्ट; मुंबईत कसा होणार पाऊस? काय सांगतंय हवामान खातं?
Maharashtra weather forecast Update news : ऑगस्ट महिन्यात काहिशी विश्रांती घेतलेल्या पावसाने सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात दमदार एन्ट्री घेतली आहे. अशातच राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून कुठे रेड तर कुठे ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिला आहे.
राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. राज्यात काही ठिकाणी पावसाचा रेड तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे. धुळे, नंदुरबार, परभणी, हिंगोली, नांदेडमध्ये पावसाचा रेड अलर्ट तर जळगाव, नाशिक, जालना, औरंगाबाद, बीड आणि अकोल्यात हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईमध्ये हलक्या आणि मध्यम सरी कोसळण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे. यासह पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामानतज्ज्ञ होसाळीकर यांनी सोशल मीडियाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, ‘राज्यात काही ठिकाणी पुढील ४ ते ५ दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर येत्या २४ तासांसाठी मराठवाडा, विदर्भाच्या काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकणात ही याचा प्रभाव असणार आहे. आजही पावसाचा जोर कायम असण्याची शक्यता आहे. तर येत्या ४ सप्टेंबरपासून तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे’
Published on: Sep 02, 2024 05:55 PM
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
