Maharashtra Flood : कसं जगावं आता, 9 एकर गेलं रे पाण्याखाली… डोळ्यात पाणी अन् बळीराजाची सरकारकडे आर्त हाक
निफाडजवळील अचोवे नाला व येरगावाजवळ रस्ते जलमय झाले आहेत. परभणीच्या पालम तालुक्यातील तरुण शेतकरी खंडू माटे यांच्या ९ एकर शेतीचे पूर्णतः नुकसान झाले असून, त्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.
परभणी जिल्ह्याच्या पालम तालुक्यातील तरुण शेतकरी खंडू माटे यांची नऊ एकर शेती पूर्णतः पाण्याखाली गेली आहे. या पावसामुळे त्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, त्यांनी शासनाकडे मदतीची मागणी केली आहे. खंडू माटे यांनी आपला आक्रोश व्यक्त करत, एकरी साडे आठ हजार रुपये खर्चात कसे वावरायचे आणि काय उरेल असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी पंजाबमधील एकरी ५० हजार रुपये मदतीचा संदर्भ देत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दयनीय स्थितीकडे लक्ष वेधले आहे. या नुकसानीमुळे आपण जगणार नाही, अशी तीव्र भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
दुसरीकडे, नाशिक-छत्रपती संभाजीनगर राज्यमार्गावर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. वाहनचालकांना तारेवरची कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत. निफाडजवळील अचोवे नाला आणि येरगाव या ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाल्याने रस्ते जलमय झाले आहेत. या भागातील सद्यस्थितीची दृश्ये समोर आली आहेत.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

