Maharatra Rain : तुम्ही मान्सून पिकनिक प्लान करताय? ‘या’ पर्यटनस्थळांवर 2 महिने No Entry, कारण…
maharashtra tourist places in monsoon : दरवर्षी साताऱ्या जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी पाहायला मिळते. मात्र सध्या मुसळधार पाऊस होत असल्याने अपघात, दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेता पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने १९ ऑगस्टपर्यंत पर्यटनस्थळांवर बंदी असणार आहे.
राज्यभरात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. अशातच राज्यातील पर्यटनस्थळं, धबधब्यांवर पर्यटकांची आतापासूनच गर्दी होताना दिसतेय. मात्र तुम्ही देखील साताऱ्या जिल्ह्यातील काही पर्यटनस्थळावर पिकनिक काढण्याचा प्लान करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागातील घाट माथा परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यात असणाऱ्या पर्यटनस्थळांवर पर्यटकांना पुढील दोन महिने मनाई असणार आहे. म्हणजेच १९ ऑगस्टपर्यंत साताऱ्यातील पर्यटनस्थळे बंद राहणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील मान्सून पिकनिकचं नियोजन करत असाल तर सातारा जिल्ह्यातील पर्यटकांवर तुम्हाला पावसाळी सहलीचा आनंद घेता येणार नाही.
या पर्यटनस्थळांवर नो एन्ट्री
अजिंक्यतारा किल्ला, ठोसेघर धबधबा, केळवली सांडवली धबधबा, वजराई धबधबा, कासपुष्प पठार, एकीव धबधबा, कास तलाव , बामनोली, सडा वाघापूर उलटा धबधबा, ओझर्डे धबधबा, घाटमाथा धबधबा,लिंगमळा धबधबा, तसेच महाबळेश्वर आणि पाचगणी पर्यटन स्थळ त्याचबरोबर धरण अशा पर्यटन स्थळाच्या परिसरामध्ये पर्यटक गर्दी होत असते. त्यावर पर्यटकांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनाने सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी निर्बंध घातले आहेत.

मोठा हॉल अन् पडदे टाकून बनवलेल्या वर्गखोल्या

ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याचा प्रश्न विधीमंडळात गाजला

गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये उसळला भक्तांचा महासागर

शिक्षकांच्या आंदोलनाला यश, महाजनांची मोठी घोषणा; येत्या 8 दिवसांत...
