चंद्रपुरात पावसाचं थैमान! घरं पाण्यात, जीव वाचवण्यासाठी धडपड; होत्याचं नव्हतं झालं अन्…
VIDEO | चंद्रपुरात हाहा:कार, वर्धा नदीलाही पूर अन् इरईचं पाणी चंद्रपूर शहरात.. बघा विदारक परिस्थिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट
मुंबई, 29 जुलै 2023 | गेल्या दिवसांपासून राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यात आणि परिसरात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळाले. गुरूवारी रात्री झालेल्या पावसामुळे इरई नदीला पूर आला आणि चंद्रपुरात सगळं होत्याचं नव्हतं झालं. एनडीआरएफ पथकानं या पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी एकच धडपड करून सुखरूप वाचवले. ईरई नदीला पूर आल्यानं चंद्रपुरात पूरस्थिती निर्माण झाली होती. पाण्याखाली गेलेल्या घरासमोर जात घरात कुणी आहे का? अशी बचावपथकाकडून चंद्रपूरकरांना आर्त साद देण्यात येत होती. गुरूवारी झालेल्या सततच्या पावसानं शुक्रवारी शहरात विदारक स्थिती पाहायला मिळाली. घराच्या छतापर्यंत पाणी पोहतल्यानं नागरिकांनी घराच्या छतावर जाऊन आपला जीव वाचवण्याची धडपड केली. व्हिडीओमध्ये दिसणारी दृश्य कोणतीही नदी नाही तर पावसाच्या पाण्यानं शहराच्या रस्त्यावर पाणी भरल्यानं पूर स्थिती निर्माण झाली आहे.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग

