Anil Parab | माझ्याकडून काहीच चूक झालेली नाही, त्यामुळे मी चौकशीला सामोरं जातोय : अनिल परब
मला ईडीचं दुसरं समन्स मिळालं आहे. मी चौकशीला जात आहे. शिवसेनाप्रमुख आणि मुलीची शपथ घेऊन मागे सांगितलं आहे की मी काहीही चुकीचं काम केलं नाही, असं अनिल परब म्हणाले
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या मुलीचं शपथ घेऊन मी मागेच सांगितलं होतं की मी काही चुकीचं केलेलं नाही. आताही तेच सांगत आहे. मी काहीच चुकीचं काम केलं नाही. मला दुसरं समन्स आल्याने मी ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं.
दुसरं समन्स आल्यानंतर अनिल परब आज ईडीच्या चौकशीला जात आहे. त्यांनी ईडीच्या चौकशीला जाण्यापूर्वी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मला ईडीचं दुसरं समन्स मिळालं आहे. मी चौकशीला जात आहे. शिवसेनाप्रमुख आणि मुलीची शपथ घेऊन मागे सांगितलं आहे की मी काहीही चुकीचं काम केलं नाही. चौकशीत जे प्रश्न विचारले जातील त्याचे उत्तर देईल. कशासाठी बोलावलं मला माहीत नाही. मला कोणतंही स्पष्ट कारण दिलं नाही. चौकशीला गेल्यावर कळेल. तिकडे गेल्यावर अधिकृतपणे कळेल, असं परब यांनी सांगितलं.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

