वादळी पावसामुळे लातूरमधील अनेक गावं अंधारात; पिकांचेही नुकसान
महाराष्ट्रातील यवतमाळ, बीड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, ज्वारी, आंबा या पिकांना फटका बसला असून, अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. शेतकऱ्यांनी लाखोंचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. पंचनाम्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला आहे. यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, मारेगाव, महागाव, उमरखेड आणि पुसद तालुक्यांमध्ये गहू, हरभरा, पालेभाज्या आणि फुलशेतीला अतोनात नुकसान झाले आहे. वासुदेव झाडे या शेतकऱ्याचे सुमारे साडेतीन ते चार लाखांचे नुकसान झाले आहे.

या वादळी पावसामुळे लातूर जिल्ह्यातील रेणापूर, अहमदपूर, चाकूर तालुक्यांमधील अनेक गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. विजेच्या खांबांच्या तारा तुटल्याने संपर्क तुटला असून, वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मोठी बातमी! महिला आरक्षणबाबत पंतप्रधान मोदींची पुढची रणनिती तयार, भविष
महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देऊन विरोधकांनी... पंतप्रधान नेरेंद्र
मोठी बातमी! नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणात मोठी अपडेट, निदा खानच्या त्या
खरातचा मृत्यू अपघातात किंवा आजरपणामुळे होऊ शकतो; रोहित पवारांचे मोठे व