संजय दौंड यांनी खरोखरच खाली डोकं वर पाय केलं, राज्यपालांच्या विरोधात निषेधासन
विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Assembly Budget Session) पहिल्या मिनिटापासून वादळी ठरताना दिसत आहे. कारण अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत भाजप आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवरच घोषणाबाजी केली.
विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Assembly Budget Session) पहिल्या मिनिटापासून वादळी ठरताना दिसत आहे. कारण अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत भाजप आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवरच घोषणाबाजी केली. तर राज्यपालांच्या अभिभाषणावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांंनी घोषणाबाजी केल्याने भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी काढता पाय घेतला. त्यानंतर विधानपरिषद आमदार संजय दौड (Sanjay Daund) यांनी चक्क विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच खाली डोकं वर पाय केलं. राज्यापाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी दौंड यांनी शीर्षासन केलं.
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...

