नाशिकच्या निफाडमधील तापमान 10 अंशावर, एकीकडं थंडीचा आनंद, दुसरीकडं शेतकरी हवालदिल

जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशासह उत्तरेकडील देशांमध्ये सुरु असलेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे निफाड तालुका हा गारठून निघाला आहे.

जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशासह उत्तरेकडील देशांमध्ये सुरु असलेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे निफाड तालुका हा गारठून निघाला आहे. आज पहाटेपासून ढगाळ वातावरण तयार झाल्याने वाऱ्यामधील गारवा थोडासा कमी झाल्याने निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात 10 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झालीय,  निफाडकरांना थंडीपासून अंशतः दिलासा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सोमवारी 6 अंशापर्यंत किमान तापमानाचा पारा गेला होता या गारठून टाकणाऱ्या थंडीतून ऊब मिळवण्यासाठी ठीक-ठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत, तर, कोणी फिरणाचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहे. मात्र, वाढत्या थंडीनं शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI