Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होणार, हवामान खात्याकडून ‘या’ 13 जिल्ह्यांना अलर्ट
राज्यात मुंबईसह आसपासच्या भागात थांबलेला मान्सून 14 जून पासून सक्रिय होण्याची शक्यता वाढली आहे. 17 जून पर्यंत राज्यात वादळी वारे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह कोकणात काही ठिकाणी जोरदार तर मध्यमहाराष्ट्र मराठवाडा,विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे
एका मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात मुंबईसह आसपासच्या भागात थांबलेला मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. सकाळपासूनच मुंबईत पावसाच्या रिमझिम सरी बरसताना दिसताय. मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यानुसार मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीतील जिल्ह्यांसोबतच पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा, विदर्भासह एकूण १३ जिल्ह्यांमध्ये पुढील आठ दिवस मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. गेल्या २६ मे रोजी मुंबईत मोठा पाऊस पडला होता. त्यावेळी मोठं नुकसान मुंबईकरांचं झालं होतं. त्यानंतर पावसानं मोठी विश्रांती घेतली होती. आज पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होतोय. पुढच्या आठ दिवस महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Published on: Jun 12, 2025 12:42 PM
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
