हिवाळी अधिवेशन फक्त 5 दिवसांचं, मार्चमध्ये नागपुरला विशेष अधिवेशन?

 राज्याचं हिवाळी अधिवेशन फक्त पाच दिवसांचं करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विमानातून प्रवास करण्यास मनाई करण्यात आल्याने यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईतच होणार आहे.

मुंबई: राज्याचं हिवाळी अधिवेशन फक्त पाच दिवसांचं करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विमानातून प्रवास करण्यास मनाई करण्यात आल्याने यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईतच होणार आहे. शिवाय मार्चमध्ये विशेष बाब म्हणून नागपूरमध्ये अधिवेशन घेण्यात येणार आहे.

आज कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाच दिवसांचं अधिवेशन घेण्यात येत असल्याबद्दल ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. अधिवेशन न घेण्याची सरकारची कार्यप्रणाली आहे. चार-पाच दिवसच अधिवेशन घेण्याचं या सरकारचं घटत आहे. एकूण कामकाजाचे दिवस पाच आहेत. त्यातील पहिला दिवस केवळ शोक प्रस्तावात जातो. म्हणजे चार दिवसाचं अधिवेशन होणार आहे, असं फडणवीस म्हणाले.

Published On - 1:48 pm, Mon, 29 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI