राऊत फक्त मोठ्या साहेबांच ऐकतात? अजित पवार आघाडीला सोडून जातील; भाजप नेत्याचा दावा
आज अजित पवार यांनी कोण राऊत असे म्हटल्याने त्यांच्यातील वाद मिटलेला नसल्याचेच उघड होत आहे. यावरून पुन्हा एकदा भाजपच्या खासदाराने अजित पवार हे मविआतून बाहेर पडतील असा बाँम्ब टाकल्याने खळबळ उडाली आहे
अमरावती : महाविकास आघाडितील राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटात सध्या वाद होताना दिसत आहेत. खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानानांवर विरोधी पक्ष नेते अजित पवार सध्या चांगलेच नाराज दिसत आहेत. त्यांनी आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे सांगताना कोणी आमच्या पक्षाचं वकिलपत्र घेऊ नेऊ असा टोला राऊत यांना लगावला होता. त्यानंतर मी फक्त शरद पवार यांच ऐकतो असे सांगत राऊत यांनी वाद वाढवला होता. त्यावर आज अजित पवार यांनी कोण राऊत असे म्हटल्याने त्यांच्यातील वाद मिटलेला नसल्याचेच उघड होत आहे. यावरून पुन्हा एकदा भाजपच्या खासदाराने अजित पवार हे मविआतून बाहेर पडतील असा बाँम्ब टाकल्याने खळबळ उडाली आहे.
भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांच्यामुळे जनतेची करमणूक होत असल्याचं म्हटलं आहे. तर ते फक्त शरद पवार यांच ऐकतात. त्यांच्या सांगण्यावरूनच त्यांनी शिवसेना फोडली आणि आता मविआ. यांच्या अशा या वागण्यानेच 40 आमदार बाहेर पडले आणि आता अजित पवार ही बाहेर पडतील असे बोंडे यांनी म्हटलं आहे.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

