AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malegaon Abuse Case: 3 वर्षाच्या चिमुकलीसोबत हैवानानं नको ते केलं...मालेगाव हादरलं; मार्चेकरी थेट कोर्टात शिरले अन्....

Malegaon Abuse Case: 3 वर्षाच्या चिमुकलीसोबत हैवानानं नको ते केलं…मालेगाव हादरलं; मार्चेकरी थेट कोर्टात शिरले अन्….

| Updated on: Nov 21, 2025 | 2:26 PM
Share

मालेगावातील मोर्चामध्ये दादा भुसे यांचाही सहभाग नोंदवण्यात आला. मालेगावमधील या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप असून, जलदगतीने न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मालेगावमध्ये एका तीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि तिच्या हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा, विशेषतः फाशीची शिक्षा मिळावी या मागणीसाठी आज मालेगाव शहरात मोठा मोर्चा काढण्यात आला. मालेगाव बंदची हाकही देण्यात आली होती. या मोर्चामध्ये महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता, त्यांनी आरोपीला तातडीने फाशी द्यावी अशी आक्रमक मागणी केली. काल आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्या ठिकाणीही महिलांनी आक्रमक पवित्रा घेत आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्याची मागणी केली होती.

मोर्चा मालेगाव न्यायालयाच्या आवारात पोहोचल्यानंतर संतप्त मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यांची आक्रमकता इतकी वाढली की, त्यांनी न्यायालयाच्या इमारतीत शिरण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्यांना रोखले. गेट बंद करून मोर्चेकऱ्यांना आत जाण्यापासून परावृत्त करण्यात आले. पोलिसांनी बळाचा वापर करत मोर्चेकऱ्यांना कोर्ट परिसराबाहेर काढले. मोर्चेकऱ्यांचा न्यायालयात घुसण्याचा प्रयत्न होता, मात्र पोलिसांनी त्यांना यशस्वीरित्या रोखले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

Published on: Nov 21, 2025 02:26 PM