Malegaon Bomb Blast 2008 : गेल्या 17 वर्षात काय झालं? चर्चेत असणाऱ्या कोण आहेत साध्वी प्रज्ञा ठाकूर?
ज्या बाईकवर बॉम्बस्फोट झाला, त्याचा तपास साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या पर्यंत पोहोचला तर मालेगावातील स्फोटासाठी वापरलेली बाईक साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबईतील विशेष न्यायालय आज निकाल देणार आहे. ज्यामध्ये भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचा समावेश आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागलं आहे. 29 सप्टेंबर 2008 रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास मालेगावच्या भिक्कू चौकात बॉम्बस्फोटची घटना घडली. यामध्ये 6 मुस्लिम नागरिकांचा मृत्यू झाला होता तर 100 हून अधिक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येतेय. दरम्यान, या घटनेनंतर तपास सुरू असताना घटनास्थळावर एक दुचाकी सापडली जी हिंदुत्ववादी नेत्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या नावावर असल्याचे समोर आले. 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा ठाकूर या आरोपी ठरल्या. साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे, हत्येचा आरोप आहे. तसेच त्यांच्यावर UAPA ची कलमं लावण्यात आली आहे. बघा चर्चेत असणाऱ्या कोण आहेत साध्वी प्रज्ञा ठाकूर?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा

