AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मालेगाव बॉम्ब स्फोट

मालेगाव बॉम्ब स्फोट

29 सप्टेंबर 2008 रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे बॉम्बस्फोट झाला होता. मशिदीजवळ उभ्या असलेल्या एका मोटारसायकलला स्फोटके बांधून हा स्फोट घडवून आणण्यात आला होता. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता आणि 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. हा स्फोट रमजानच्या काळात लोक नमाजासाठी जात असताना झाला होता. ऑक्टोबर 2008 मध्ये महाराष्ट्र एटीएसने या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर 2009 मध्ये या प्रकरणाची चौकशी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडे (NIA) सोपवण्यात आली. 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांना जामीन दिला. NIA ने या प्रकरणात दिलेल्या अंतिम युक्तिवादात म्हटले होते की, कटकर्त्यांनी मालेगाव स्फोटाची कटकारस्थान मुस्लिम समाजातील काही लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी, आवश्यक सेवा विस्कळीत करण्यासाठी, धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी आणि राज्याच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करण्यासाठी रचले होते.

Read More
मालेगाव बॉम्बस्फोट: कर्नल पुरोहितांची पुण्यात जंगी मिरवणूक

मालेगाव बॉम्बस्फोट: कर्नल पुरोहितांची पुण्यात जंगी मिरवणूक

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी १७ वर्षांनंतर सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले गेले आहे. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह साध्वी प्रज्ञा सिंह आणि इतर आरोपींचा मुंबईतील विशेष एनआयए कोर्टाने निर्दोष मुक्त केले. पुण्यात परतल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

मालेगाव प्रकरणात सर्वात मोठा खुलासा; ‘मोदी-योगी’ यांचे नाव, साध्वीच्या आरोपांनी एकच खळबळ, काय होता तो ‘प्लॅन’?

मालेगाव प्रकरणात सर्वात मोठा खुलासा; ‘मोदी-योगी’ यांचे नाव, साध्वीच्या आरोपांनी एकच खळबळ, काय होता तो ‘प्लॅन’?

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणात एक खळबळजनक दावा आता समोर आला आहे. संशयाच्या आधारावर निर्दोष सुटलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी हा दावा केला आहे. त्यावरून नव्या वादाची ठिणगी पडली आहे.

साध्वी प्रज्ञा सिंह यांची निर्दोष सुटल्यावर पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाल्या, हिंदू दहशतवादाच्या जन्मदात्याचं…

साध्वी प्रज्ञा सिंह यांची निर्दोष सुटल्यावर पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाल्या, हिंदू दहशतवादाच्या जन्मदात्याचं…

मालेगाव स्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. हा भगवा आणि सनातन धर्माचा विजय आहे असे त्या म्हणाल्या. त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर, भगवा दहशतवाद आणि हिंदू दहशतवादाची जनक काँग्रेससह सर्व धर्मद्रोही बदनाम झाले आहेत, असे त्यांनी नमूद केलं.

‘खुद अपना कत्ल कर लेती…’, मालेगाव निकालानंतर जावेद अख्तरांची विचार करायला लावणारी पोस्ट

‘खुद अपना कत्ल कर लेती…’, मालेगाव निकालानंतर जावेद अख्तरांची विचार करायला लावणारी पोस्ट

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील निकाल जाहीर झाल्यानंतर गीतकार जावेद अख्तर यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी निकालावर नाराजी व्यक्त केल्याचं म्हटलं जात आहे. मालेगाव प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली.

Malegaon Bomb Blast : ‘या’ एका कारणामुळंच मालेगाव स्फोटाचे सर्व आरोपी निर्दोष, 17 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं?

Malegaon Bomb Blast : ‘या’ एका कारणामुळंच मालेगाव स्फोटाचे सर्व आरोपी निर्दोष, 17 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं?

१७ वर्षांनंतर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयए कोर्टाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांसह सर्व सात आरोपींना पुराव्याच्या अभावी निर्दोष मुक्त केले. कोर्टाने स्फोटासाठी वापरलेल्या बाईकबाबत आणि आरोपींच्या सहभागासंबंधी पुरेसे पुरावे सापडले नाहीत, असे निरीक्षण नोंदवले. पीडित कुटुंबांनी मात्र या निकालाविरोधात हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट निकालानंतर पोलीस सतर्क, सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात

मालेगाव बॉम्बस्फोट निकालानंतर पोलीस सतर्क, सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर पोलिस प्रशासन सतर्क आहे. 17 वर्षांनंतर आलेल्या या निकालानंतर शहरात शांतता आहे, तरीही अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले असून सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांवर देखील लक्ष ठेवले आहे.

Malegaon Blast Case : मालेगाव स्फोटप्रकरणात मोहन भागवतांना अटक करण्याचे होते आदेश, माजी ATS अधिकाऱ्याचा दावा

Malegaon Blast Case : मालेगाव स्फोटप्रकरणात मोहन भागवतांना अटक करण्याचे होते आदेश, माजी ATS अधिकाऱ्याचा दावा

Malegaon Blast Case : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 7 आरोपींना एनआयएच्या विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. काल हा निकाल सुनावण्यात आला. यानंतर, या स्फोटाच्या तपासात सहभागी असलेल्या माजी एटीएस अधिकाऱ्याने काही मोठे धक्कादायक दावे केले आहेत.

सनातनी दहशतवाद म्हणा, पण भगवा शब्द..; पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान

सनातनी दहशतवाद म्हणा, पण भगवा शब्द..; पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी विशेष एनआयए न्यायालयात झाली असून त्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भगवा नव्हे, सनातनी दहशतवाद म्हणा… पृथ्वीबाबांनी फोडलं वादाला तोंड; आणखी काय म्हणाले?

भगवा नव्हे, सनातनी दहशतवाद म्हणा… पृथ्वीबाबांनी फोडलं वादाला तोंड; आणखी काय म्हणाले?

पृथ्वीराज चव्हाण यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सरकारला धारेवर धरलं आहे. तसेच हा निकाल म्हणजे गृह विभागाचे अपयश असल्याचेही चव्हाण म्हणाले.

काँग्रेसने हिंदू समाजाला आतंकवादी दाखवण्याचा प्रयत्न केला, आता त्यांनी संपूर्ण समाजाची माफी मागावी – CM फडणवीस

काँग्रेसने हिंदू समाजाला आतंकवादी दाखवण्याचा प्रयत्न केला, आता त्यांनी संपूर्ण समाजाची माफी मागावी – CM फडणवीस

मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी आज विशेष NIA न्यायालयाने निकाल दिला. आरोप सिद्ध न झाल्याने न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

जाणूनबुजून निकृष्ट तपास केला..; असदुद्दीन ओवैसींचा सरकारवर निशाणा

जाणूनबुजून निकृष्ट तपास केला..; असदुद्दीन ओवैसींचा सरकारवर निशाणा

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष एनआयए न्यायालयाने सर्व आरोपींना पुराव्यांच्या अभावी निर्दोष मुक्त केले आहे. या निर्णयावर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला या निकालाविरुद्ध अपील करण्याची मागणी केली आहे. ओवैसी यांनी एनआयएच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, या प्रकरणातील न्याय मिळवण्यासाठी पुढील पाऊले उचलण्याची मागणी केली आहे.

Nitesh Rane : …त्यांच्या तोंडावर चपराक, पुन्हा कुणीही हिंमत करू नये, मालेगाव बॉम्बस्फोट निकाल येताच नितेश राणेंचा घणाघात

Nitesh Rane : …त्यांच्या तोंडावर चपराक, पुन्हा कुणीही हिंमत करू नये, मालेगाव बॉम्बस्फोट निकाल येताच नितेश राणेंचा घणाघात

आतंकवादाला ताकद देणे आणि जिहादला ताकद देणं हे विरोधकांचे सुरू होतं. ज्यांनी ज्यांनी यांची बदनामी केली, त्यांनी नाक रगडून माफी मागितली पाहिजे, अशी मागणी नितेश राणेंनी केली.

दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.
दादांसारखा नेता जाणं महाराष्ट्राची हानी - हर्षवर्धन सपकाळ
दादांसारखा नेता जाणं महाराष्ट्राची हानी - हर्षवर्धन सपकाळ.