भगवा नव्हे, सनातनी दहशतवाद म्हणा… पृथ्वीबाबांनी फोडलं वादाला तोंड; आणखी काय म्हणाले?
पृथ्वीराज चव्हाण यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सरकारला धारेवर धरलं आहे. तसेच हा निकाल म्हणजे गृह विभागाचे अपयश असल्याचेही चव्हाण म्हणाले.

Malegaon Bomb Blast Case Verdict : गेल्या कित्येक वर्षांपासून 2008 सालच्या मालेगाब बॉम्बस्फोट प्रकरणावर सुनावणी घेतली जात होती. या प्रकरणी आता एनआयएच्या विशेष न्यायालयाने या सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलं. या बॉम्बस्फोटाच्या घटनेत एकूण सहा जणांचा मृत्यू झाला होता तर 100 जण जखमी झाले होते. दरम्यान, न्यायालयाने हा निकाल दिल्यानंतर काँग्रेसने माफी मागावी, अशी मागणी केली सत्ताधारी भाजपाकडून केली जात आहे. असे असतानाच राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाच्या निकालावर बोलताना भगवा दहशथवाद नाही तर सनातनी दहशतवाद म्हणा, असंही मत व्यक्त केलंय.
पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?
मालेगावचा बॉम्बस्फोट 2008 साली झाला. एकूण 17 वर्ष हा खटला चालला. कोणीतरी हा बॅाम्बस्पोट केला. मला हा निकाल अपेक्षित होता. कारण तपासातून आलेले प्रतिकूल पुरावे, होस्टाईल साक्षीदार यामुळे तपास अपुरा राहिला, असे मत पृथ्वाराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
सनातनी दहशतवाद म्हणा- पृथ्वीराज चव्हाण
तसेच, आरडीएक्स बाजारात सहज मिळत नाही. एनआयए हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या इशाऱ्यावर चालते. या बॉम्बस्फोटात अनेक लोक जखमी झाले. न्यायालयाच्या निर्णयानुसार कोणीच दोषी नाही. मग स्फोट कोणी केला? असा थेट सवालही पृथ्वीराज चव्हाण उपस्थित केला. तसेच हा निकाल आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आतंकवाद भगवा न कभी था, ना है, ना कभी रहेगा’ असे ट्वीट केले. त्यावरही बोलताना भगवा हा शब्द वापरू नका. भगवा हा आमच्यासाठी महत्त्वाचा रंग आहे. तो महाराजांचा ज्ञानेश्वरीचा रंग आहे. सनातनी दहशतवाद म्हणा. दहशतवादाला धर्म नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
बॉम्बस्फोट कोणी केले ते समोर आलं पाहिजे
भारतातील सर्वात पहिला दहशतवादी नथुराम गोडसे आहे. तो कोणाच्या विचाराने पुढे आला. सरकार, चौकशी यंत्रणा अपयशी ठरली आहे. एनआयए ही अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली काम करते, असा हल्लाबोही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर टीका केली होती. तसेच काँग्रेसने माफी मागितील पाहिजे, अशी मागणी केली होती. यावर बोलताना मुख्यमंत्री काहीही म्हणतील. माफीचा प्रश्न येत नाही. सगळे निर्दोष सुटले बॉम्बस्फोट कोणी केले ते समोर आलं पाहिजे. नंतर मग बघू, अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली.
हे गृह विभागाचे अपयश- पृथ्वीराज चव्हाण
पुरावे सापडले नाही यापेक्षा पुरावे सादर केले गेले नाहीत असे म्हणता येईल. पहलगामवरील हल्ल्यातील आरोपी पकडलेले नाहीत. मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात पुराव्यांची पुर्तता न झाल्याने सुटका झाली. आजही तेच झाले. गृह विभागाचे हे अपयश आहे, अशी टीकाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
