जाणूनबुजून निकृष्ट तपास केला..; असदुद्दीन ओवैसींचा सरकारवर निशाणा
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष एनआयए न्यायालयाने सर्व आरोपींना पुराव्यांच्या अभावी निर्दोष मुक्त केले आहे. या निर्णयावर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला या निकालाविरुद्ध अपील करण्याची मागणी केली आहे. ओवैसी यांनी एनआयएच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, या प्रकरणातील न्याय मिळवण्यासाठी पुढील पाऊले उचलण्याची मागणी केली आहे.
मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज, 17 वर्षांनंतर, विशेष एनआयए न्यायालयाने जाहीर केला. पुराव्यांच्या अभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या निकालावर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत हा निर्णय निराशाजनक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातील फडणवीस सरकार या निकालाविरुद्ध अपील करणार का, असा थेट सवाल उपस्थित केला.
ओवैसी म्हणाले, “मालेगाव बॉम्बस्फोटात सहा नमाजी ठार झाले आणि सुमारे 100 जण जखमी झाले. त्यांच्या धार्मिक ओळखीमुळे त्यांना लक्ष्य करण्यात आले. एनआयएने या प्रकरणाचा तपास जाणीवपूर्वक निकृष्ट पद्धतीने केला, ज्यामुळे आज सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली.”
पुढे त्यांनी सरकारला उद्देशून सवाल केले, “मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींच्या निर्दोष सुटकेला स्थगिती मिळवण्यासाठी मोदी आणि फडणवीस सरकारने जशी मागणी केली होती, तशीच मागणी आता मालेगाव प्रकरणात करणार का? महाराष्ट्रातील धर्मनिरपेक्ष राजकीय पक्ष या प्रकरणात जबाबदारीची मागणी करणार का? त्या सहा जणांचा खून कोणी केला?” असे अनेक प्रश्न ओवैसी यांनी उपस्थित करत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा

