Malegaon Sakhar Karkhana Election : अजित पवार यांच्याकडून गावोगावी बूथ पाहणी
Ajit Pawar : माळेगाव साखर कारखान्यासाठी आज निवडणूक पार पडत आहे. अजित पवार यांच्याकडून गावोगावी जाऊन बूथची पाहाणी करण्यात येत आहे.
माळेगाव साखर कारखान्यासाठी आज निवडणूक पार पडत आहे. संध्याकाळी 6 पर्यंत मतदान सुरू राहणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून गावोगावी जाऊन बूथची पाहाणी करण्यात येत आहे. मतदान झाल्याशिवाय बूथ सोडू नका अशा सूचना यावेळी अजित पवार यांच्याकडून करण्यात आल्या आहे. अजित पवार हे स्वत: निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांची आणि शरद पवार यांच्या पॅनलची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. सुप्रिया सुळे यांनी स्वत: प्रचारात सहभाग घेतलेला होता. त्यांच्या विरोधात 85 वर्षांच्या चंद्राराव तावरे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. चंद्राराव तावरे यांचा सहकार बचाव शेतकरी पॅनल हे या निवडणुकीत आहे. तसंच कष्टकरी शेतकरी संघर्ष समितीचं पॅनलसुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात आहे.