West Bengal Election Results 2021 | नंदीग्राममधून ममता बॅनर्जी जिंकल्या

ममता बॅनर्जी यांचा पाडाव करण्यासाठी या निवडणुकीत भाजपचे आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा आणि दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले होते. (Mamata Banerjee won from Nandigram west bengal)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:18 PM, 2 May 2021

कोलकाता: कोलकाता: संपूर्ण देशाचे लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांचा तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार, असे संकेत मिळत आहेत. ममता बॅनर्जी यांचा पाडाव करण्यासाठी या निवडणुकीत भाजपचे आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा आणि दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले होते. गेल्या काही वर्षांमध्ये भाजपकडून बंगालमध्ये (West Bengal Election Results 2021) पद्धतशीरपणे ध्रुवीकरणाचे राजकारण करण्यात आले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने तृणमूल काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांना गळाला लावले. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्त्वाची लढाई झाली होती. हे आव्हान स्विकारत ममता बॅनर्जी भाजपसमोर ठामपणे उभ्या राहिल्या होत्या.