Nashik : फाटकी नोट नाकरली अन् राग डोक्यात, पंपावर काढली थेट तलवार; बघा पोलिसांनी कशी उतरवली भाईची भाईगिरीच
नाशिकच्या एका पेट्रोल पंपावर फाटकी नोट न स्वीकारल्याने एका व्यक्तीने कर्मचाऱ्याला थेट तलवार दाखवून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला शोधून काढले. त्याला त्याच पेट्रोल पंपावर आणून जाहीर माफी मागण्यास लावले आणि कायदेशीर कारवाई केली.
नाशिक शहरातून एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे, जिथे पेट्रोल पंपावर दहशत माजवणाऱ्या एका व्यक्तीला नाशिक पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. नाशिकच्या बोधले नगर भागातील एका पेट्रोल पंपावर हा प्रकार घडला. फाटकी नोट स्वीकारण्यास कर्मचाऱ्याने नकार दिल्याने संबंधित व्यक्ती संतप्त झाला. त्याने थेट तलवार काढून कर्मचाऱ्याला धाक दाखवण्याचा आणि परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी तातडीने दखल घेतली.
पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला कायद्याचा बडगा दाखवत, त्याच पेट्रोल पंपावर त्याची धिंड काढली आणि केलेल्या कृत्याबद्दल जाहीर माफी मागण्यास भाग पाडले. पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना अशा प्रकारे वठणीवर आणून नाशिकमध्ये कायद्याचे राज्य प्रस्थापित केले आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

