Ranjeet Chogle : मृताला जिवंत दाखवून लाटली सदनिका; सामनातून शिंदेच्या नेत्यावर आरोप
शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यावर आज सामनामधून काही गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
सामनामधून शिंदेंच्या शिवसेनेवर सातत्याने टीका होत असते. आज देखील शिंदेंच्या नेत्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे चर्चा सुरू झाल्या आहेत. मृत व्यक्तीला जीवंत दाखवून सदनिका लाटत 70 लाखांचा अपहार केल्याचा प्रकार घडला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते मंगेश सातमकरांवर सामनामधून हे गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. म्हाडा, इन्कमटॅक्स, जिल्हाधिकारी, कोर्ट आणि रुग्णालयाची फसवणूक केली. सदनिका 70 लाख रुपयांना विकली गेली असल्याचे आरोप सामनामध्ये केलेले आहेत. तर मी जे आरोप केले त्याबद्दल माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. कारवाई करा, अशी मागणी तक्रारदार रणजित चोगले यांनी ही मागणी केली आहे.
दरम्यान, ज्याने बातमी दिली त्याच्या विरोधात कारवाई करणार असल्याचं शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हंटलं आहे. सामनामधून झालेल्या या आरोपांमुळे रजकीय वर्तुळात मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

