भोंगे, स्पीकरशिवाय गणेशोत्सव.. ; अविनाश जाधवांचा शेलारांना खोचक सवाल
मनसे नेते अविनाश जाधव यांनी आज धार्मिक स्थळावरील भोंग्याच्या मुद्द्यावरून भाष्य करत आशीष शेलार यांना प्रश्न उपस्थित केला आहे.
तुम्ही तुमचा नमाज मस्जिदच्या आत पढा ती देखील देवापर्यंत जाते त्यासाठी भोंगा लावून ओरडण्याची गरज नसते. आमच्या काकड आरत्या ओरडून होत नाही, देव आमच्या शांत आरत्या ऐकतो. वर्षांत 365 दिवस भोंगे लागणार मात्र आमचा वर्षातून पाच ते दहा दिवस सण भोगे लागणे यात फरक आहे, असं मनसे नेते अविनाश जाधव यांनी म्हंटलं आहे. भोंगे, स्पीकर याशिवाय गणेशोत्सव कसा साजरा होईल? शेलारांनी सांगावं, असा खोचक प्रश्न देखील यावेळी बोलताना अविनाश जाधव उपस्थित केला.
पुढे बोलताना अविनाश जाधव म्हणाले की, सरकारने जाहीर केल आहे गणपती उत्सव हा महाराष्ट्रचा उत्सव आहे. उत्सव मध्ये भोंगे डीजे असतात त्याशिवाय कसा उत्सव साजरा होणार. सरकारने त्यांची भूमिका पहिली ठरवावी. आशिष शेलार म्हणाले गणपती म्हणजे महाराष्ट्राचा उत्सव. विना भोंगे स्पीकरच्या उत्सव कसा होतो हे आशिषलाराने आम्हाला पटवून सांगावे. वर्षातून येणारे सण आहेत संध्याकाळी आरतीला फक्त भोंग्याचा वापर होतो तोही फार कमी मंडळात होतो. महाराष्ट्राला सणाचा दर्जा दिला आहे तर या सणाला भोंग्याची गरज आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

