जरांगे पाटील, भुजबळ यांच्या वादात शिंदे गटाच्या खासदाराची उडी, सत्तेत असताना काय प्रयत्न केले?
छगन भुजबळ यांनी समाजात विष पेरू नये. त्यांनी जी काही माहिती सांगितली ती लोकसंख्या केंद्राची आहे. सामाजिक तेढ निर्माण होऊ नये, ही आमची भूमिका. पण, सभा घेऊन ते गैरसमज पसरवत आहेत. एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून तेढ निर्माण करू नये, असे आमचे म्हणणं आहे.
नाशिक | 18 नोव्हेंबर 2023 : मंत्री छगन भुजबळ यांनी काल अनेक विषयांवर चुकीची माहिती दिली आणि मराठा समाजाला डिवचण्याचे काम केले. ते सातत्याने ५४ टक्के लोकसंख्या आणि २७ टक्के आरक्षण असं म्हणतात. पण राज्यात सरकारी वेबसाईटवर ओबीसी ३२.८२ टक्के इतकी लोकसंख्या आहे. चुकीचे माहिती देऊन ते गैरसमज पसरवत आहे, अशी टीका शिंदे गटाचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी केली. ज्या ओबीसी ३४६ जाती आहेत. त्यात त्यांनी लाभार्थ्यांची यादी जाहीर करावी. किती टक्के लोकांना लाभ मिळाला ते जाहीर करावे असे आवाहन त्यांनी मंत्री भुजबळ यांना दिले. ओबीसी महामंडळ आहे, त्यांनी किती लोकांच्या स्वयंरोजगारासाठी प्रयत्न केले? २००६ साली राज्य मागास आयोगाची स्थापना झाली. त्यात revision करण्याचे का प्रयत्न केले नाही? त्यांनी सत्तेत असताना काय प्रयत्न केले? मराठा समजाळा डिवचण्याचे काम त्यांनी करू नये. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये असा इशाराही त्यांनी दिला.
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....

