Maratha Reservation Rally : जरांगे मुंबईच्या वेशीवर… 3 हजारांहून अधिक वाहनांचा ताफा अन् आझाद मैदानावर मराठ्यांचा एल्गार
मनोज जरांगेंचा ताफा ईस्टर्न फ्रीवेवरून आझाद मैदानाच्या दिशेकडे मार्गस्थ झाला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, या प्रमुख मागणीसाठी सातत्याने मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करताना दिसताय. मात्र त्यांची मागणी सरकारकडून पूर्णतः मान्य केली जात नसल्याने त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. मराठी समाजाच्या आरक्षणासाठी जरांगेंनीची आक्रमक पवित्रा घेत पुन्हा मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाची हाक दिली आहे. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजपासून आंदोलन सुरू होत आहे. दरम्यान, मुंबईत गणेशोत्सवाची मोठी धूम पाहायला मिळत असते. यंदाही भाविक मोठ्या प्रमाणात गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी बाहेर पडताय. मात्र गणेशोत्सवात कोणताही अडथळा नको, म्हणून मुंबई हाय कोर्टाने जरांगे यांना आझाद मैदान येथे आंदोलन करण्यास मनाई केली होती. मात्र पोलिसांनी काही अटी-शर्थी घालून फक्त एका दिवसाची परवानगी देत आंदोलन करण्यास सांगितले आहे. एका दिवसाची परवानगी मिळताच मनोज जरांगे पाटील मोठ्या ताफ्यासह मुंबईच्या वेशीवर धडकल्याचे पाहायला मिळतंय.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?

