‘तो लिंबू कापणारा, अंगारा लावणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात…’, मनोज जरांगे पाटलांची कुणावर जिव्हारी टीका?
अंतरवाली सराटीमध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी लाठीचार्ज झाला होता. त्यानंतर जरांगे पाटलांनी तेथून पळ काढला होता. पण राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी पुन्हा अंतरवाली जरांगे पाटलाला आणलं होतं, असा खळबळजनक दावा छगन भुजबळ यांनी केला होता. यावर मनोज जरांगे पाटलांनी पलटवार केलाय.
छगन भुजबळ हे एक चमत्कारी बाबा आहे. लिंबू कापणारा, अंगारा लावणारा असा चमत्कारी बाबा सारखा दिसणारा छगन भुजबळ असल्याची खोचक टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. छगन भुजबळ याला सगळ्यांच्या मनातलं कळत असतं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की राज्यात कुठेही दंगली घडवू देऊ नको. म्हातारपणा कोणत्याही पापाचा डाग लावून घेऊ नको, असा एकेरी उल्लेख करत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. पुढे जरांगे असेही म्हणाले की, म्हातारणात खूप मस्ती आली आहे. ओबीसी-मराठा समाजात वाद निर्माण करून दोन्ही समाजात दंगली घडवून आणू नको, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना मराठा आरक्षणावरून इशारा दिला आहे. तर ओबीसी आणि मराठा समाजात विनाकारण भांडण लावू नये, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना केलं असून छगन भुजबळांमुळे ओबीसी समाजाने मराठ्यांशी वैर घेऊ नये असे म्हटले आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

