Manoj Jarange Patil : आता मराठ्यांचे डोळे उघडणार, मराठवाड्यातील मराठा OBC आरक्षणात जाणार, जरांगे नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील मराठा समाज कुणबी असल्याचा दावा करत त्यांना १००% ओबीसी आरक्षण मिळणार असल्याचे सांगितले. आरक्षणाला विरोध करणाऱ्यांवर त्यांनी टीका केली, मराठ्यांना त्यांचे खरे विरोधक कोण आहेत हे ओळखण्याचे आवाहन केले.
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथून संवाद साधताना मराठवाड्यातील मराठा समाज कुणबी असल्याचा दावा केला. गॅझेटच्या आधारे मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजालाही लवकरच हे गॅझेट लागू होऊन आरक्षणात समावेश होईल, असे त्यांनी सांगितले.
जरांगे पाटील यांनी आरक्षणाविरोधी मतांना फेटाळून लावले. मराठा समाजाला इतकी वर्षे आरक्षण होते, मात्र ते मिळाल्याचे दिसत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मराठ्यांनी आपले खरे विरोधक कोण हे ओळखून राजकारणापेक्षा आपल्या समाजाच्या आणि मुलांच्या भवितव्याला महत्त्व द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. ओबीसी आरक्षणातून मराठ्यांना मिळणारे आरक्षण कायमस्वरूपी टिकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

