Maratha Reservation Protest : भगवं वादळ मरीन ड्राईव्हवर धडकलं, असंख्य मराठा आंदोलक समुद्र किनारी उतरले अन्…
मराठा आंदोलक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्टेशनवर मोठ्या संख्येने जमले होते आणि आता ते मरीन ड्राईव्ह भागातील समुद्रकिनाऱ्यावर पोहोचले आहेत. तिने त्यांनी एकच गर्दी केली आहे.
मराठा आरक्षणाची मागणी लावून धरत मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईतील आझाद मैदानात त्यांनी आपल्या उपोषणाला सुरुवात केली आहे. आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आणि आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. अशातच मनोज जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणासाठी आपला पाठिंबा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने माराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून मराठा बांधवांची मुंबईतील आझाद मैदान, बीएमसी बाहेरील परिसर, आणि सीएसएमटी रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी केली. शेकडोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत धडकल्याने मुंबईत मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचे पाहायला मिळाली. आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकावर मोठी गर्दी केल्यानंतर आता हे मराठा आंदोलक मरिन ड्राईव्ह भागात समुद्र किनारी उतरल्याचे पाहायला मिळत आहे.
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला

