Manoj Jarange Video : कैलास बोराडे प्रकरण वेगळ्या वळणावर, ‘मद्यधुंद अन् अर्धनग्नावस्थेत…’; जरांगेंनी थेट दाखवला व्हिडीओ
कैलास बोराडे हा मद्यधुंद आणि अर्धनग्न अवस्थेत असून तो अशा अवस्थेत मंदिरात गेल्याचा हा व्हिडीओ असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी दाखवला आहे.
जालन्यातील कैलास बोराडे नावाच्या व्यक्तीला गरम सळईने चटके दिल्याच्या प्रकरणाला नवं वळण आल्याचे पाहायला मिळत आहे. कैलास बोराडे या व्यक्तीचा मद्यधुंद अवस्थेतील एक व्हिडीओ मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणला आहे. कैलास बोराडे हा मद्यधुंद आणि अर्धनग्न अवस्थेत असून तो अशा अवस्थेत मंदिरात गेल्याचा हा व्हिडीओ असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी दाखवला आहे. दरम्यान, ‘कैलास बोराडे प्रकरणात छगन भुजबळांनी जातीयवाद आणला’, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांना चांगलाच हल्लाबोल केला. पुढे ते असेही म्हणाले. तर परळीत आमच्या एका व्यक्तीला दुसऱ्या जातीच्या व्यक्तीने खूप मारले. परंतु त्या प्रकरणाकडे आम्ही तशापद्धतीने पाहिले नाही. कारण आम्हाला जातीवाद आणयचा नाही. कोणतीही घटना घडली की त्याला जातीयवादाच्या नजरेतून का बघता? असं वळण राज्यात पाडायचं आहे का? अशा क्रूर घटना घडल्यानंतर माणुसकीचं वळणं दिले पाहिजे, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमकपणे प्रतिक्रिया देत छगन भुजबळांवर निशाणा साधला. तर महापुरुषांची विटंबान करणाऱ्यांना आणि देव देवांची विटंबना करणाऱ्यांना मकोका लाववा पाहिजे. विधिमंडळाच्या या अधिवेशनात मकोकासारखा नवीन कायदा आणला गेला पाहिजे. तुम्ही हिंदुत्ववादी असाल तर हा कायदा करा, अशी मागणीही जरांगे पाटलांनी केली.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
