AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर ठरलं! उद्या अंतरवलीत मोठी बैठक; मनोज जरांगे उद्या मुंबईकूचची तारीख जाहीर करणार

अखेर ठरलं! उद्या अंतरवलीत मोठी बैठक; मनोज जरांगे उद्या मुंबईकूचची तारीख जाहीर करणार

| Updated on: Sep 11, 2026 | 1:48 PM
Share

मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज चौदावा दिवस असून, त्यांची प्रकृती खालावल्याने सलाईनद्वारे उपचार सुरू आहेत. उद्या अंतरवली सराटी येथे मराठा बांधवांसोबत १२ वाजता महत्त्वाची बैठक होणार आहे. यात मुंबई दौऱ्याची तारीख निश्चित केली जाईल. आरक्षणावर तोडगा निघेपर्यंत जरांगे पाटील आंदोलनावर ठाम असून, सरकारने ताठरपणा सोडून चर्चा करावी अशी मागणी आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज चौदावा दिवस आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून, डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावून उपचार केले आहेत. रात्रीही त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सलाईन लावण्यात आली होती.

उद्या अंतरवली सराटी येथे दुपारी १२ वाजता जरांगे पाटील मराठा बांधवांसोबत एक महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीत मुंबईकडे जाण्याच्या तारखेची घोषणा केली जाईल, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मिशन मुंबईसाठी माध्यमांची व्हॅन देखील तयार असून, मुंबईला जाण्याचा त्यांचा निर्धार कायम आहे. “१२ तारखेला तारीख डिक्लेअर करणार,” असे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. आरक्षणावर तोडगा निघेपर्यंत ते आंदोलनावर ठाम आहेत. सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून तोडगा काढावा, असे आवाहनही करण्यात येत आहे.

Published on: Sep 11, 2026 01:47 PM

Follow Us