Mansukh Hiren Case | मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी आणखी दोनजण एनआयएच्या ताब्यात

आतापर्यंत अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात 10 जणांना अटक करण्यात आली आहे. (Mumbai Crime Two more arrested NIA Mansukh Hiren Murder Case)

मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एन्काऊण्टर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांच्या अटकेनंतर आणखी दोघा जणांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) ताब्यात घेतल्याची माहिती आहे. याशिवाय एनआयए आता शर्मांच्या निकटवर्तीय पोलीस अधिकाऱ्याच्याही मागावर आहे. आतापर्यंत अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात 10 जणांना अटक करण्यात आली आहे. (Mumbai Crime Two more arrested NIA suspects Encounter Specialist Pradeep Sharma aide Police officer in Mansukh Hiren Murder Case)