Duplicate Jarange Video : तुम्ही पण फसताय लेका… आंदोलनस्थळी जरांगेंची डिट्टो कॉपी, एकदा बघाच डुप्लिकेट जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी मराठा आरक्षणासाठी अनेक आंदोलने केली आहेत. त्यांच्या या उपोषणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच आज आंदोलनस्थळी मनोज जरांगे पाटलांची डिट्टो कॉपी पाहायला मिळाली.
मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. आज सकाळी शेकडो मराठा आंदोलकांसह मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर दाखल झालेत. अशातच या आंदोलनस्थळी मनोज जरांगे पाटील यांची डिट्टो कॉपी पाहायला मिळाली. डोक्यावर भगवी टोपी, गळ्यात भगवी शॉल, फ्रेंच कट दाढी आणि हातवारेही सेम टू सेम.. तुम्ही हे डुप्लिकेट मनोज जरांगे पाटील बघितले तर तुम्ही देखील काही काळ गोंधळून जाल हे नक्की..
दरम्यान, मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणात जरांगेंची प्रमुख मागणी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे ही आहे. मनोज जरांगेंच्या या आंदोलनाला मराठा समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी आणि राजकीय नेत्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. मुंबईत हजारोंच्या संख्येने मराठा बांधव आल्याने आझाद मैदान परिसरात भगवं वादळ उसळल्याचे पाहायला मिळतंय.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

