Breaking | मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक, कार्यकर्त्यांचं मंत्रालयाबाहेर आंदोलन

मराठा आऱक्षण प्रश्नी पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झाला आहे. मंत्रालयाबाहेर मराठा कार्यकर्त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली.

मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने 102 व्या घटना दुरुस्तीचे दाखला देत, राज्य सरकारला एखाद्या समाजाला मागास ठरवण्याचा अधिकार नाही, असा निकाल दिला होता. त्यानंतर मागील काही काळापासून कोणतीच हालचाल सरकारकडून होत नसल्याने मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. मराठा ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत मंत्रालयाबाहेर जात घोषणाबाजी केली.

यावेळी संतप्त मराठा समाजाने मंत्री अशोक चव्हाण आणि विजय वड्डेटीवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. मराठा ठोक मोर्चाचे बरेच कार्यकर्त्ये यावेळी उपस्थित होते. यावेळी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झालेला पाहायला मिळाला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI