‘चुलीत गेले नेते अन् चुलीत गेला पक्ष’, मराठा आरक्षणावरून अनेक गावांमध्ये नेत्यांना नो एन्ट्री
tv9 Special Report | मराठा आरक्षणावरून नेत्यांना गावबंदी, बंदी करणारं धुळे हे पहिलं शहर ठरलंय. सोलापूरच्या माढ्या तालुक्यात 37 गावांसह सातारा, सांगली, परभणी, सोलापूर, जळगाव, नाशिक, संभाजीनगर, बीडसह अनेक जिल्ह्यांमध्ये नेत्यांना बंदीचा निर्णय घेतला आहे.
मुंबई, २४ ऑक्टोबर २०२३ | अनेक गावांमध्ये नेत्यांना बंदीचा आकडा वाढत चाललाय. दुसरीकडे नेत्यांच्या वाहनांचा ताफाही मराठा आंदोलक अडवू लागले आहेत. आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या युवकाच्या अंत्यविधीला भाजपचे नेते हरिभाऊ बागडे पोहोचले. मात्र स्थानिकांनी त्यांना गावातून बाहेर जायला सांगितलं, नंतर बारामतीतच अजित पवारांना मराठा आंदोलकांनी घेरावा घातला. सिल्लोडच्या एका गावात न उतरताच मंत्री अब्दुल सत्तांराना वाहनांचा ताफा परत फिरवावा लागला. जालन्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कार्यक्रमात गोंधळ झाला. लातूरमध्ये मंत्री संजय बनसोडेंचा ताफा आंदोलकांनी रोखला. पैठणमध्ये मंत्री भुमरेंचं पोस्टर जाळून आंदोलकांनी स्वतःचे मतदानकेंद्रही पेटवून दिले. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा वणवा साऱ्या महाराष्ट्रात पसरु लागलाय. चुलीत गेले नेते, चुलीत गेला पक्ष, असे बॅनर लावून अनेक गावांना नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान

