‘लक्ष्मण हाके डान्सबारमध्ये दारू पितात, आमच्याकडे व्हिडीओ अन्…’, कोणी केला घणाघात?
ओबीसी समाजासाठी लढणारे लक्ष्मण हाके यांचा काल वाद पाहायला मिळाला. काल मराठा समाजातील आंदोलकांनी लक्ष्मण हाके यांना पकडून पोलिसांच्या हवाले केलं होतं. इतकंच नाहीतर लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केल्याचा दावाही आंदोलकांनी केला
लक्ष्मण हाके यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला. यासंदर्भात मराठा समन्वयक गंगाधार काळकुटे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘लक्ष्मण हाके हा कोंढवा परिसरात नेहमी दारू पित असतो. त्यांच्यासंदर्भात आम्हाला अनेक दिवसांपासून माहिती होती. माझ्या छावा संघटनेच्या पूणे जिल्हाध्यक्ष असलेले सुधीर मते यांनी त्यांना पाहिलं पकडलं. सुधीर मते आणि लक्ष्मण हाके हे दोन्ही जण एकाच भागात राहतात पण काल लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाच्या संदर्भात वक्तव्य केलं त्यांनतर हा सगळं प्रकार घडलं आहे. जर आमच्या लोकांनी हाकेला पकडलं असेल तर आम्हाला अभिमान आहे. हाच हाके ओबीसी समाजासाठी स्टंट उपोषण करतो. तो कोणत्या कोणत्या डान्सबार जाऊन दारू पितो. हे सगळ्यांना माहीत आहे त्याचे व्हिडीओ देखील आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्ही कोणाच्या वैयक्तिक जीवनात जाणार नाही पण हा हाके जेव्हा जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना वैयक्तिक टीका करतो तेव्हा आम्हाला सुद्धा तुझ्या आयुष्यात घुसवां लागेल. आत्ता फक्त हा ट्रेलर आम्ही दाखवला आहे जर यापुढे जरांगे पाटील यांच्या विरोधात तुम्ही काय केल तर आम्ही पूर्ण पिक्चर दाखवू, असा इशारा गंगाधार काळकुटे पाटील यांनी दिला.