
औरंगाबादच्या क्रांती चौकातून निघाला मराठा क्रांती मोर्चा; काय आहेत मागण्या?
शहरातून आज मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झाली आहे. औरंगाबादच्या क्रांती चौकातून मराठा समाजाचा विराट मोर्चा निघाला.
औरंगाबाद, 09 ऑगस्ट 2023 | शहरातून आज मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झाली आहे. औरंगाबादच्या क्रांती चौकातून मराठा समाजाचा विराट मोर्चा निघाला. आरक्षणाच्या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात हजारो मराठा बांधव सहभागी झाले आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी हा मोर्चा पुकारला आहे मोर्चात सर्व मराठा संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. तसेच आज मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने चेंबूर पांजरापोळ इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकासमोरील हायवे जॅम करण्याचा कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे.
Published on: Aug 09, 2023 12:40 PM
Related Video
कंडोम तयार करणाऱ्या कंपनीची कमाल, एका वर्षात १ लाखाचे झाले ९ लाख रुपये
भाजपमध्ये या... अमित शाह यांची थेट ऑफर; एकनाथ खडसे म्हणाले की..
टी20 क्रिकेटला पराभवाची उतरण, इंग्लंडविरुद्धचा पाचवा सामनाही गमावला
'या' दिवशी भारतात लाँच होणार मोटोरोलाचा नवीन फोन
सोनीचा 25x ऑप्टिकल झूम आणि 4K 120fps रेकॉर्डिंगसह नवीन कॅमेरा लाँच
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..