आम्हाला मुंबईत येऊन मंत्र्यांची घरं बघायची आहेत, मनोज जरांगे पाटील यांनी दिला इशारा
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी लावून धरली असून त्यासाठी २५ जानेवारीपासून सुरु केलेले उपोषण आज भाजपा आमदार सुरेश धस आणि खासदार बजरंग सोनावणे यांच्या उपस्थितीत उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
अंतरवाली सराटीत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आता स्थगित करण्यात आले आहे. आता यापुढे शक्यतो उपोषण आंदोलन होणारच नाही आता थेट समोरासमोर लढाई होणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. आम्हाला मुंबई येऊन मंत्री कसे राहतात. ? त्यांची घरी कशी आहेत? ते कोणत्या ताटात जेवतात?. कोणत्या कपातून चहा पितात?. कानवाल्या की बिगर कानाच्या कपातून चहा पितात हे आम्हाला पाहायचे आहे असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आठ मागण्या केल्या होत्या. ते आमच्या मागण्या पूर्ण करतील असा आम्हाला अजूनही विश्वास आहे. आपण गेली तीन महिने त्यांच्याविरोधात काही बोललेला नाही. आता आम्ही नियोजन पद्धतीने मुंबईत दाखल होणार असून दोन कोटी मराठे मुंबईत दाखल होणार आहेत अशा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.